वाहनधारक त्रस्त
पैठण, (प्रतिनिधी) : पेट्रोल डिझेलची दरवाढ होताच पैठण शहरातील तिन्ही व पाटेगाव पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा साठा संपला आहे. तीन दिवसांपासून पेट्रोल, डिझेल साठी वाहनधारक शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर चकरा मारताना दिसत आहेत.
दरम्यान आज सकाळी दोन पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल आले असताना पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठ्या रांगा लावलेल्या दिसून आले आहेत. गावा बाहेरील हॉटेल पेट्रोल पंपावर तर पैठण पाचोड फाट्या पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आढळून आल्या आहेत.
तसेच शहरातील पेट्रोल पंपावर लांबापर्यंत वाहन धारकाच्या रांगा असल्याचे दिसून आले. दुचाकी चार चाकी वाहनधारक हातात कॅनी, बॅरल घेऊन नंबर लावताना दिसून आले. सध्या रब्बी हंगामासाठी शेतकरी मशागतीला लागले असून शेतजमीन नागारासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे मात्र सध्या डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने मशागती थांबल्या आहेत.















